गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष,विश्वजित कोवासे यांचे 26 ला पदग्रहण व शेतकरी मेळावा. 📍पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार.

गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष,विश्वजित कोवासे यांचे 26 ला पदग्रहण व शेतकरी मेळावा.


📍पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार.


एस.के.24 तास 


गडचिरोली : काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अँड.विश्वजित मारोतराव कोवासे यांचा पदग्रहण सोहळा आणि शेतकरी मेळावा येत्या 26 मे रोजी गडचिरोलीत होणार आहे.या मेळाव्याला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. याशिवाय ज्यांनी जुन्याच अध्यक्षांना पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली ते पदाधिकारीसुद्धा सोबत येतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य अँड.राम मेश्राम,प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.

माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील पटांगणात, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब,भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे,एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे,खासदार डॅा.नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे

आ.अभिजित वंजारी,आ.रामदास मसराम, आ.सुधाकर अडबाले,महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी,माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी उपस्थित राहतील,अशी माहिती यावेळी देण्यात आली.पत्रपरिषदेला बंडू शनिवारे, पुष्पलता कुमरे, रजनीकांत मोटघरे, रूपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, नगरसेवक श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या या पदग्रहण आणि नागरी सत्कार सोहळ्याला, तसेच शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, माजी जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे आदींनी केले.

त्यांना साथ दिली,तेही साथ देतील

जिल्हाध्यक्षपदावरून काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर होईल,असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी राहणार नाही.त्यांनी नेतृत्व केले त्यावेळी आम्ही त्यांना साथ दिली.आता ते सुद्धा आम्हाला साथ देतील, असे पदाधिकारी म्हणाले. 

महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी निश्चितपणे चांगले काम केले,पण याचा अर्थ दुसऱ्यांना संधी मिळू नये असे नाही. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरवत आता नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे हेसुद्धा चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतील, असा विश्वासही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !