नवेगाव - मुरखळा परिसरातील नागरिकांचा ST स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.


नवेगाव - मुरखळा परिसरातील नागरिकांचा ST स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.


एस.के.24 तास 


गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ST स्मार्ट कार्ड शिबिराला नवेगाव - मुरखळा परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.दि.23 मे रोजी वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका,गणपती मंदिर, नवेगाव गडचिरोली येथे हे शिबिर पार पडले.



या शिबिरामध्ये महिला,युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत ST स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. नागरिकांची वाढती उपस्थिती आणि उत्साह पाहता परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

सामाजिक कार्यकर्ते भूषणा खेडेकर व राणी गोपशेटवार यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व सुविधा सहज उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून सामाजिक कार्यकर्ते भूषणा खेडेकर व राणी गोपशेटवार यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आभार मानले.तसेच भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांनी पुढाकार घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या शिबिरामुळे अनेक नागरिकांना प्रवासासाठी आवश्यक असलेले ST स्मार्ट कार्ड सहज उपलब्ध होण्यास मदत झाली असून,ग्रामीण भागात अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !