पत्नी केली धारधार शस्त्राने पतीचा गळा चिरून केली हत्या.

1 minute read

पत्नी केली धारधार शस्त्राने पतीचा गळा चिरून केली हत्या.


एस.के.24 तास


बल्लारपूर : पतीला दारूचे व्यसन होते.दारू च्या व्यसनामुळे घर बर्बाद होऊ लागले.यामुळे पती पत्नीत वाद होत होता.नेहमी कडक्याचे भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेतला.धारदार शस्त्राने तिने पतीचा गळा चिरला.पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची हृदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोड़े) येथे बुधवार (दि. १७) रोजी मध्यरात्री 2.00 वा.च्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पतीचे नाव,अमोल मंगल पोडे वय,38 वर्ष रा.नांदगाव (पोळे)ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आहे. 


घटनेतील आरोपी पत्नी,लक्ष्मी अमोल पोडे वय,35 वर्ष हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव (पोड़े) गात 5 हजारावर लोकसंख्येचे आहे.या गावात पति पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आज गुरुवारी सकाळी 7.00 वा.उघडकीस आल्यावर घटनास्थळी गावाकऱ्यांनी एकच गर्दी केली.


मृतक अमोल हा पत्नी लक्ष्मी ता दोन मुले देवांश अमोल पोडे वय,11 वर्ष आणि सारंग अमोल पोडे वय,8 वर्ष सोबत राहत होते.मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले.यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आभाळ होत होती.यामुळे पत्नी लक्ष्मी ग्रस्त होती. नेहमी प्रमाणे काल बुधवारी अमोल घरी मध्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मी सोबत वाद घातला. उभयतात कडाक्याचे भांडण झाले. 


तिने सततच्या जाचाला कंटाळून पती अमोललासंपविण्याच्या कट केला.दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेले. ही संधी साधून लक्ष्मीने कडक लक्ष्मीचा अवतार धारण केला. कोंबड्याच्या कातीने, धारदार शस्त्राने अमोलचा गळा चिरून त्याला यमसदणी धाडले. रक्ताच्या थरोळ्यात तो मृत झाला. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली.विशेष म्हणजे पतीच्या  हत्येची माहिती स्वता लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे.पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अमोलचे शव शवविच्छेदनासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यातिय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !