गोंडपिपरी - आष्टी मार्गावरील तारसा गावाजवळ ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक युवकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी.
एस.के.24 तास
गोंडपिपरी : आक्सापूर परिसरात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली असून ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.ही दुर्घटना शनिवारी दिनांक,17/01/2026 रात्रौ सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास गोंडपिपरी - आष्टी मार्गावरील तारसा गावाजवळ घडली.
या अपघातात पिंटू ऊर्फ आर्यन प्रेमानंद गोंगले वय,19 वर्ष रा. विठ्ठलवाडा या दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर शेरू ऊर्फ श्रेयश रवी डोर्लीकर वय,23 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार आर्यन गोंगले व श्रेयश डोर्लीकर हे दोघेही युवक शनिवारी रात्रौ MH.33 AH 9869९ क्रमांकाच्या दुचाकीने गोंडपिपरी येथून आपल्या विठ्ठलवाडा गावाकडे जात होते. तारसा गावाजवळ समोरून येणाऱ्या TS.17 T 3132 क्रमांकाच्या ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आर्यन गोंगले याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रेयश डोर्लीकर गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून जखमी युवकावर तातडीने उपचार करण्यात आले.या घटनेने विठ्ठलवाडा व परिसरात शोककळा पसरली आहे.

