गडचिरोली जिल्हा पोलीस भरती - 2024 - 2025 दि 11 फेब्रुवारी पासून चालक पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ. 📍(प्रत्यक्ष भरती - 2026) च्या मैदानी चाचणी दि.11 फेब्राुवारी पासून प्रारंभ ; दि.14 फेब्रुवारी पासून पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ. 📍प्रत्येक उमेदवाराकडे गडचिरोली जिल्ह्राचे वैद्द रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य ; प्रत्येक उमेदवाराची सर्व प्रमाणपत्रे/कागदपत्रे दि. 07/12/2025 पूर्वीची असणे बंधनकारक.

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती - 2024 - 2025 दि 11 फेब्रुवारी पासून चालक पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ.


📍(प्रत्यक्ष भरती - 2026) च्या मैदानी चाचणी दि.11 फेब्राुवारी पासून प्रारंभ ; दि.14 फेब्रुवारी पासून पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ.

📍प्रत्येक उमेदवाराकडे गडचिरोली जिल्ह्राचे वैद्द रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य ; प्रत्येक उमेदवाराची सर्व प्रमाणपत्रे/कागदपत्रे दि. 07/12/2025 पूर्वीची असणे बंधनकारक.


एस.के.24 तास


गडचिरोली : दि.10/02/2026 गडचिरोली पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती – 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026) 27 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026) 717 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणीची तारीख जाहिर झालेली असून ती दिनांक 11/02/2026 ते 08/03/2026 या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.  


सविस्तर वृत्त असे की, 27 चालक पोलीस शिपाई पदाकरिता 3296 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असुन त्यापैकी 2797 पुरुष उमेदवार व 499 महिला उमेदवार यांचे आहेत. तसेच पोलीस शिपाईच्या 717 पदाकरिता एकुण 23,791 उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन त्यापैकी 16,310 पुरुष उमेदवार व 7, 481 महिला उमेदवार यांचे आहेत. 


चालक पोलीेस शिपाई पदाच्या एकुण 27 जागांपैकी अनुसुचित जाति- 03, अनुसुचित जमाति-06, विज-(अ)-01, भज(ब)-01, भज(क)- 01, भज (ड)-01, विमाप्र-01, इमाव-05, एसईबीसी-02, इडब्ल्युएस-02, अराखीव-04 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.11/02/2026 ते 13/02/2026 या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. 


या सोबतच पोलीस शिपाई पदाच्या एकुण 717 जागांपैकी अनुसुचित जाती-84, अनुसुचित जमाति-92, विज(अ)-08, भज (ब)-08, भज (क)- 08, भज (ड)-15, विमाप्र-08, इमाव-121, एसईबीसी-58, इडब्ल्युएस-58, अराखीव-257 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती दि.14/02/2026 ते 07/03/2026 या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. 


सदर भरती प्रक्रीयेदरम्यान दि. 11/02/2026 रोजी पहिल्या दिवशी 1300 उमेदवारांची व त्यानंतर दरदिवशी सरासरी 1500 उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. 


सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 


तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारीख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणी करीता आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहणेबाबत गडचिरोली पोलीस दलामार्फत कळविण्यात येत आहे. 


सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार असुन  यामध्ये उमेदवारांची छाती - उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology  चा वापर करण्यात येणार आहे. 


यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology  आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारिरीक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखीपरीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवुन शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. 


सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. 


सदर पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करु नये,असे करतांना आढळुन आल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करुन त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 


उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !