देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत येथे तालुका दिव्यांग समारोह संपन्न.

देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत येथे तालुका दिव्यांग समारोह संपन्न.


एस.के.24 तास


देसाईगंज (वडसा) : कुरूड ग्रामपंचायत, येथे तालुका दिव्यांग समारोह कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात पन्नासहून अधिक दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुरूड ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. शंकर पारधी साहेब यांनी भूषविले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ग्रामपंचायत सचिव मा. दामोदर पटले सर होते.

 

प्रमुख अतिथी म्हणून रेखा मडावी (ग्रामपंचायत सदस्य, कुरूड) उपस्थित होत्या.कार्यक्रमाला कुरूड येथील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमामध्ये युथ फॉर जॉब्स फाउंडेशनचे जिल्हा फेलो मा. उमेश बन्सोड यांनी संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण, रोजगार व स्वावलंबन योजनांची सविस्तर माहिती दिली.


तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. दामोदर पटले सर यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देत UDID (दिव्यांग ओळखपत्र) कार्डचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन युथ फॉर जॉब्स फाउंडेशनचे प्रशिक्षक नितेश सिडाम यांनी केले.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किशोर मेश्राम तसेच युथ फॉर जॉब्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक ताराचंद सहारे यांनी केले.हा कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व स्वावलंबनाकडे नेणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !