सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे मांदूळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्या 5 आरोपीना अटक 1 फरार.
📍गडचिरोली जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे.
एस.के.24 तास
सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रत्नापूर बिटात मांदूळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्या आरोपीसह खरेदी करणाऱ्याना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.पैशाचा पाऊस व गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने सदर सापाची खरेदी करण्याचा व्यवहार सुरू असताना वनविभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ही कारवाई केली. या कारवाईत 5 आरोपींना ताब्यात घेतले असून यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव मधील रत्नापूर बिटात गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने मांदूळ जातीचा अंदाजे साडेतीन ते साडेचार फूट लांबीचा साप पकडून विक्री करण्याचा व्यवहार सुरू होता.
रात्रीच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी अंजली सायंकार (बोरावार), क्षेत्रसाहाय्यक सिडाम,वनरक्षक चहांदे व नागरे यांच्यासह वनकर्मचारी गस्तीवर असताना मांदूळ जातीच्या सापाचा लाखो रुपयांमध्ये सौदा होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हिवराज श्यामराव गहाणे यांच्या घरी धाड टाकण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने अधिक तपास केला असता,मालवन जातीचा जिवंत साप आढळून आला.साप तस्करी प्रकरणी संशयित आरोपी म्हणून...
1) अशोक धोंडू आत्राम वय,५९ वर्ष रा.रत्नापूर ता.सिंदेवाही जिल्हा.चंद्रपूर
2) अनिल गोविंदा मेश्राम वय,३८ वर्ष रा.रत्नापूर ता.सिंदेवाही जिल्ह.चंद्रपूर
3) ईश्वर दुर्योधन शेंडे वय,५३ रा.धामनगाव चक ता.नागभीड जिल्हा.चंद्रपूर
4) निर्मल अनिल हलदार वय,६० वर्ष रा.नेताजीनगर ता. चामोर्शी.जि.गडचिरोली
5) सरोज सिबो मालो वय,३८ वर्ष रा.सुंदरनगर ता.मुलचेरा जि. गडचिरोली
यांना रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
हिवराज गहाणे हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. या प्रकरणात अजूनही काहीजण सहभागी असण्याची शक्यता असून आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे. सर्व आरोपीविरुद्ध १० फेब्रुवारीला गुन्हा नोंदवून सिंदेवाही येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले.

