डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स,ब्रम्हपुरी येथेb संत शिरोमणी गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 


या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकवृंद तथा सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील संत गाडगे महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त केली.
 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !