मोटरसायकलला विरूध्द दिशेने जाणार्‍या एसटी बसने धडक ; एका महिलेचा मृत्यू.

मोटरसायकलला विरूध्द दिशेने जाणार्‍या एसटी बसने धडक ; एका महिलेचा मृत्यू.


एस.के.24 तास


तुमसर : (ST Bus Accident) : वरठी मार्गावरील दाभा मोडीवर भंडार्‍याकडून येणार्‍या मोटरसायकलला विरूध्द दिशेने जाणार्‍या एसटी बसने धडक दिली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. (ST Bus Accident) सदर घटना दि. ६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान घडली. कमला शालिकराम नगरधने(६०) असे मृतकाचे तर विकेश भावदास चकोले(२४) दोन्ही रा. रोहा असे जखमीचे नाव आहे.

रोहा येथील विकेश चकोले हा मोटारसायकल क्रमांक एमएच ३६ टी २८५४ या गाडीने कमला नगरधने या महिलेला दवाखान्यातून भंडारा येथून स्वगावाकडे घेऊन जात असतांना दाभा मोडीवर विरूध्द दिशेने जाणारी तुमसर- नागपूर भंडारा मार्गे जाणारी एसटी बस क्रमांक एमएच १४ केक्यू ८६७० च्या चालकाने आपल्या ताब्यातील एसटी बस निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला धडक दिली. 

यात (ST Bus Accident) मोटारसायकलस्वार रस्त्यावर पडून जखमी झाले.जखमींना उपचाराकरीता रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे जखमी कमला नगरधने या महिलेचा मृत्यू झाला. (ST Bus Accident) अपघाताची माहिती वरठी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांत एसटी चालक विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वरठीचे ठाणेदार निलेश गिरी यांच्या मार्गदर्शनात वरठी पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !