ट्रॅक्टर उलटला तिघे जखमी.
एस.के.24 तास
भंडारा : (Tractor Overturned ) : नागपुर-रायमार्गावर शिंगोरी फाट्यावर धान घेऊन जाणारा ट्रॅक्टर यू-टर्न झाल्याने उलटला.त्यात ट्रॅक्टरवरील तिघेजण जखमी झाले.सदर घटना दि.६ जून रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडला.
जखमींमध्ये अमित कुंडलिक राऊत (२५) रा.केसलवाडा,आर्यन मुरलीधर शिवनकर (१८) रा.बेलाटी, रूपेश शत्रुघन मांढरे (१९) रा.परसोडी अशी नावे आहेत.
ट्रॅक्टर क्र.एम एच ३६ एएल १००५ या ट्रॅक्टरमध्ये लाखनीवरून धानाचे पोते घेऊन तुमसरला आमगाव-दिघोरी मार्गे जाण्यास निघाले.
आमगाव-दिघोरीकडे वळताना महामार्गावर शिंगोरी फाट्यावर ट्रॅक्टर यू - टर्न होताच ट्रॅक्टर व ट्रॉली उलटली. त्यात (Tractor Overturned) ट्रॅक्टरवरील तिघेजण जखमी झाले.
अपघाताची माहिती जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज रूग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतुरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तिघाही जखमींना रूग्णवाहिकेतून उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले आहेत.