अक्षर मैत्री पॅनल ला बहुमतांनी विजयी करावे.उमेदवारांचे सभासदांना आवाहन.
अमरदीप लोखंडे सहसंपादक
ब्रह्मपुरी - १२/०२/२६ नुकत्याच जाहीर झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या २०२६ ते २०३१ या कालावधी करिता जाहीर झालेल्या अध्यक्ष व सभासदांच्या निवडणुकीत अक्षरमैत्री पॅनल च्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन अध्यक्ष पदाचे उमेदवार व ईतर उमेदवारांनी केले आहे.आज पर्यंत त्यांनी वीदर्भ साहित्य संघासाठी केलेल्या कामाची गौरवशाली कारकीर्द सभासदांच्या डोळ्यापुढे ठेवली आहे.
विदर्भ साहित्य संघ ही १०३ वर्षांची दीर्घ व गौरवशाली परंपरा असलेली विदर्भातील ख्यातनाम वाङ्मयीन संस्था आहे. २०२१ पासून विद्यमान कार्यकारिणी कार्यरत आहे. या कार्यकाळात संस्थेची नेत्रदीपक प्रगती झाली असून साहित्य , संस्कृती आणि कला या क्षेत्रांत संस्थेने पूर्वीसारखेच भरीव योगदान दिले आहे.
हीच वैभवशाली परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यमान अध्यक्ष श्री. प्रदीप दाते आणि सरचिटणीस श्री. विलास मानेकर यांच्या नेतृत्वात खालील 'अक्षरमैत्री ' पॅनल तयार करण्यात आले आहे. साहित्य , संशोधन, संस्कृती , शिक्षण, नाट्य, सामाजिक, कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि नव्या मान्यवरांचा या उमेदवारांमध्ये समावेश आहे. ही प्रस्तावित कार्यकारिणी पुढील पाच वर्षांत विदर्भ साहित्य संघाची गौरवशाली परंपरा पुढे नेत साहित्य-संस्कृतीविषयक अनेक नवीन उपक्रम राबवत, नवी उंची गाठण्यास कटिबद्ध आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या या निवडणुकीत अध्यक्षपदासह कार्यकारिणी सदस्यत्वासाठी उभे असलेल्या २२ उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे, असे आवाहन अक्षरमैत्री पॅनल प्रमुखांनी व श्याम मोहरकर व ईतर उमेदवारांनी केले आहे.निवडणुकीकरिता अध्यक्ष व सभासद उमेदवार .

