अ-हेरनवरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत IDA/MDA (आयडीए/एमडीए) मोहिमेचे थाटात उद्घाटन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - १३/०२/२६ आज झालेल्या उद्घाटनिय कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटिका मान. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुखदेवे मॅडम ,प्रमुख मार्गदर्शक डॉ. राहुल सहारे व डॉ. अंकुर अंडेलकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र , प्रमुख अतिथी मान.दामिनी चौधरी सरपंचा,मा.विलास उरकुडे माजी उपसभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी,श्री अकुल राऊत पोलीस पाटील , ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर नागरिक, तालुका एंटॉमोलॉजिस्ट पल्लवी दहागावकर मॅडम व आरोग्य सहाय्यक श्री. गायकवाड उपस्थित होते.
IDA/MDA मोहिमेअंतर्गत नागरिकांना औषध सेवनाचे महत्त्व, हत्तीरोग प्रतिबंध व आरोग्यविषयक जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व उपस्थित मान्यवरांना जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.सदर कार्यक्रम दिनांक १०/०२/२६ ते २३/०२/२६ पर्यंत राबविण्यात येत असल्यामुळे सर्व जनतेनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहिमेच्या उद्घाटिका तालुका वैद्यकीय अधिकारी , सुखदेवे व वैद्यकीय अधिकारी सहारे व अंडेलकर यांनी केले आहे.


