चामोर्शी ते भेंडाळा मार्गांवरील चाकलपेठ फाट्यावर ट्रकच्या धडकेत मेंढपाळ वडील गंभीर तर मुलगा किरकोळ जखमी. 📍40 मेंढ्या चिरडल्या ट्रक घेऊन चालक फरार ; गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच.

चामोर्शी ते भेंडाळा मार्गांवरील चाकलपेठ फाट्यावर ट्रकच्या धडकेत मेंढपाळ वडील गंभीर तर मुलगा किरकोळ जखमी.


📍40 मेंढ्या चिरडल्या ट्रक घेऊन चालक फरार ; गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


चामोर्शी : दिनांक,13/02/2026 शुक्रवार ला पहाटे 4:00.वा.दरम्यान मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन स्वतःच्या गावी रामाळा येथे जात असतांना चामोर्शी ते भेंडाळा मार्गांवर येणारी ट्रक चाकलपेठ फाट्यावर मेंढपाळ बाप - लेकाला जोरदार धडक दिली.मेंढपाळ मारोती रामा अन्नावार वय,55 वर्ष हे गंभीर जखमी झाले.मुलगा अतुल मारोती अन्नावार वय,28 वर्ष रा. रामाळा ता.चामोर्शी जिल्हा.गडचिरोली हे किरकोळ जखमी झाले.


त्यात 40 मेंढ्या चिरडल्या गेल्यामुळे मेंढपाळाचे खुप मोठे नुकसान झाले.गंभीर जखमी झालेल्या मारोती अन्नावार यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली भरती केले.परंतु त्यांना डोक्याला आणि छातीला जास्त मार लागून गंभीर असल्यामुळे  गडचिरोली वरून नागपूर ला हलविण्यात आले.पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.

 

ट्रक चालक फरार झाला.असून त्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी.मेंढपाळ बांधवाला नुकसान भरपाई देण्यात यावी  अशी मागणी गडचिरोली - चंद्रपूर धनगर / कुरमार समाज बांधवांकडून  केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !