गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छतेचे सावट..! 📍जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालय परिसरातील नाल्यांना डबक्याचे स्वरूप.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छतेचे सावट..!


📍जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालय परिसरातील नाल्यांना डबक्याचे स्वरूप.


एस.के.24 तास


गडचिरोली : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णालय परिसरातील नाल्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून, सदर नाल्यांमध्ये पाणी साचून त्यावर सेवाड निर्माण झाल्यामुळे नाल्यांना हिरव्या रंगाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे समोर आले आहे.सदर बाब लक्षात घेतली असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांचे सामान्य रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

       

त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे,तर संपूर्ण जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालयांचे नियोजन करण्यात जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम असतील का ? व रुग्णालयातील वार्डांमध्ये तरी स्वच्छता ठेवली जाते की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !