सिरोंचा तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका कोन्सिल स्थापन ; तेलगू भूमीत जनसंघर्षाला नवे बळ.

सिरोंचा तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका कोन्सिल स्थापन ; तेलगू भूमीत जनसंघर्षाला नवे बळ.


एस.के.24 तास


सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या तेलगू बहुल भूमीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका कोन्सिल अधिकृतपणे सुरू करण्यात आला. शोषित-पीडित जनतेच्या हक्कांच्या लढ्याला संघटित दिशा देण्यासाठी हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. 


यावेळी कॉ.रवी बारसांगडी यांची तालुका सचिव म्हणून निवड व नियुक्ती करण्यात आली. तसेच कॉ. गणेश कासेटटी,कॉ. अशोक तोकला यांच्यासह इतर सहकाऱ्यांची तालुका कोन्सिल सदस्य म्हणून निवड व नियुक्ती झाली.


ही निवड व नियुक्ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ.सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रक्रियेला जि.कोन्सिल सदस्य कॉ.सुरज जककुलवार तसेच कॉ. आकाश तेलकुंटलवार यांनी अनुमोदन दिले.


कार्यक्रमात बोलताना पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला तेलगू जनतेचे हक्क, अधिकार, जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी तसेच दोरा (जमीनदार) वर्गाच्या जुलूम-अत्याचारातून सामान्य जनतेची सुटका करण्याचा शंभर वर्षांचा लढाऊ इतिहास आहे. याच क्रांतिकारी परंपरेला पुढे नेत सिरोंचा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित,कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर संघटित संघर्ष उभारला जाणार आहे.


भांडवलशाही-कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे वाढलेल्या बेरोजगारी, महागाई, जमीन हडप, वनहक्क आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता निर्णायक जनआंदोलन उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सिरोंचा तालुक्याच्या तेलगू भूमीत जनतेचा हक्काचा जनसंघर्ष आता अधिक तेज होणार असून, लाल झेंड्याखाली लोकशाही एकजुटीची नवी लढाई सुरू झाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !