सावली तालुक्यातील व्याहाड (बु) येथे चिल्ड वॉटर व्यवसायाच्या नावाखाली अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री. 📍15 लाख 94 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई.

सावली तालुक्यातील व्याहाड (बु) येथे चिल्ड वॉटर व्यवसायाच्या नावाखाली अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री.


📍15 लाख 94 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील पोलीस स्टेशन सावली अंतर्गत येणाऱ्या व्याहाड (बु) येथे चिल्ड वॉटर व्यवसायाच्या नावाखाली अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 15 लाख 94 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


7 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मुखबिरामार्फत माहिती मिळाली की,व्याहाड (बु) येथील रहिवासी महेश गड्डमवार हा परिणीती ट्रान्सपोर्ट एक्वा चिल्ड वॉटर नावाच्या ऑफिस व गोडाऊनमधून लाल रंगाच्या हुंडाई क्रेटा कारने देशी व विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित कार तसेच ऑफिस व गोडाऊनची झडती घेतली.


या झडतीत पोलिसांना 3,800 नग देशी दारू (90 मि.ली.), 384 नग रॉयल स्टॅग विदेशी दारू (180 मि.ली.मध्यप्रदेश),96 नग रॉयल स्टॅग विदेशी दारू (180 मि.ली.महाराष्ट्र), १४४ नग हावर्ड्स 5000 कंपनीचे 500 मि.ली. कॅन, दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 2 लाख 95 हजार 410 रुपयांची रोख रक्कम, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर तसेच लाल रंगाची हुंडाई क्रेटा कार क्रं.MH.40 AR 2365 असा एकूण 15 लाख 94 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.


या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच कलम ३३६(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे,पोलीस हवालदार चेतन गज्जलवार,पोलीस अंमलदार गणेश भोयर, सुमित बरडे, दिनेश अराडे,प्रफुल्ल गारघाटे सह स्थानिक गुन्हे शाखेच्या मुल पथकांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !