तलाव पाड वार्ड क्रमांक - १द्वारा हनुमान जयंती ; आयोजक- हयग्रीव हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती मूल
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मूल : श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे हनुमान. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला होता.भक्तगण या दिवशी आनंदात, मोठ्या श्रद्धेत हा दिवस साजरा करतात.यंदा ०२ एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी हनुमान जयंती हयग्रीव हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती तलाव पाड वार्ड क्रमांक-१द्वारा हनुमान जयंती साजरी करण्याचा आयोजन करण्यात आलेला आहे.
गुरुवार दि. २ एप्रिल सकाळी ६ वाजता हयग्रीव हनुमान मंदिर जन्मोत्सव, सकाळी ८वाजता हयग्रीव हनुमान पालखी यात्रा व दुपारी २वाजता गोपाळकाला नंतर ६ वा.महाभोजन कार्यक्रम असल्यामुळे सर्व भक्तगण महाभोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन हयग्रीव हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती तलाव पाड वार्ड क्रमांक-१द्वारा करण्यात आलेला आहे.

