१५ वर्षाच्या धाडसी मयूर ने वाचवले काकाचे प्राण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथील राजेश्वर देवढगले व मयूर देवढगले दोघेही काका पुतणे उन्हाळी धानासाठी शेतावर पाणी देण्यासाठी दुपारी गेले असता मयूर देवढगले हा शेताच्या एका धु-यावर गवत कापत होता तर राजेश्वर देवढगले हा मोटार पंप सुरू करून घराकडे परतण्याच्या हेतूने माघारी फिरला असता शेतालगत असलेल्या पगाणीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
तेव्हा त्याच्या ओरडण्याने गवत कापत असलेला मयूर हातात विळा धरून धावत काका कडे गेला असता बिबट्याच्या विळख्यात काकाला पाहताच क्षणाचाही विलंब न करता धाडस करून बिबट्याकडे धावला तेव्हा बिबट्याने काकाला सोडून पगाणीच्या दिशेने पळ काढला.मात्र काकाच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या.
महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे वर्ग - ०९ मध्ये शिकत असलेल्या १५ वर्षीय धाडसी मयूर देवढगलेचे धाडस पाहून त्याच्या धाडसाचे गावभर कौतुक करण्यात येत आहे.त्याने केलेल्या धाडसामुळेच काकाचा जीव वाचला अशी जनमानसात चर्चा आहे.
त्याने केलेल्या धाडसाच्या शौर्याची दखल घेत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी व मुख्याध्यापक तथा शिक्षक रुपेश पुरी ,सचिन क-हाडे ,विनोद महल्ले,घ्यार,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशिष्ट कार्यक्रमात त्याचा गौरव केला.धाडसी, कर्तुत्ववान विद्यार्थी घडविण्याचे कार्य महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) ही सातत्याने करीत असते.सध्या दिनांक १७ ०३/२६ पासून आस्था हॉस्पिटल, ब्रह्मपुरी येथे त्याचा काका राजेश्वर देवढगले हा उपचार घेत असून उपचाराकरिता आर्थिक मदतीची खूप नितांत गरज आहे.
त्याने धाडसाने केलेल्या शौर्याची दखल शासनाने व वनविभागाने घेऊन त्याचा गौरव करावा अशी पिंपळगाव भोसले वाशीय नागरिकांची मागणी आहे.सर्वसामान्य शेतकरी असलेल्या राजेश्वर च्या कुटुंबात लहान लहान मुले असल्यामुळे त्याच्या काकाला उपचाराकरता लागणारी आर्थिक मदत तात्काळ वनविभागाने देऊन कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी.राजेश्वर देवढगले हा घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.

