झाडीपट्टी रंगभूमीवरील उभरता नायक व गायक कलावंत,प्रशांतकुमार चुधरी झाडीपट्टीत छाप पाडली.
एस.के.24 तास
चामोर्शी : झाडीपट्टी रंगभूमीला शेकडो वर्षापासूनची वैभवशाली परंपरा लाभली आहे. या रंगभूमीच्या मातीवर अनेक कलावंत उदयास आले आहेत. माणूस जन्माला आल्यानंतर तो स्वतःमध्ये कोणती ना कोणती कला घेऊन येतोच मात्र त्यांच्या कलेला दाद मिळण्यासाठी व्यासपीठ किंवा रंगभूमीची गरज असते. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे वडसा देसाईगंज हे माहेरघर असून या माध्यमातून झाडीपट्टीतील बहुसंख्य कलावंतांनी आपल्या कलेची छाप पाडली आहे. त्याच धरतीवर एक कलावंत उदयास येत आहे. तो म्हणजे प्रशांतकुमार चुधरी.
प्रशांत वामन चुधरी याचा जन्म चामोर्शी तालुक्यातील कळमगांव या छोट्याशा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्याला स्वतःच्या घरापासून बालपनापासूनच गायनाची ओढ लागली. आज तो झाडीपट्टीच्या नाटकांपर्यंत पोहचला आहे. गरीब शेतकरी कुंटुबात जन्माला आलेला हा हिरा.
कुटूंबातील सदस्य भजन गायक स्वतःचे वडील, हार्मोनियम वादक काका आणि तबला वादक चूलत भाऊ यांनी प्रशांत हा ७ ते ८ वर्षाचा असताना त्याला भजनाच्या मैफिलीत बसवायचे. तर कधी त्याच्याकडून घरीच गाण्यांचा सराव करून घ्यायचे. समोर त्याला गायनात अधिकच उत्सुकता वाटू लागली. शिकत असताना शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी वर्ग सुरू असतांना त्याच्याकडून गाणं ऐकून घ्यायचे तसतसा वाव मिळत गेला.
एवढच नाही तर प्रशांत हा स्वतः मातीच्या मुर्त्या तयार करून रंगरंगोटी करून सजावट सुध्दा करतो. २०१६ मध्ये गणपती उत्सवात ४ फूट गणेशजीची मुर्ती स्वतः तयार करून मंडपामध्ये मुर्तीच्या समोर डोंगराची सिन तयार करून डोंगरावर नंदी बैलाच्या मुखातून पाणी काढण्याची सिन गावकरी व इतरांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून अधिकच त्याची वाहवा होत गेली. व पुन्हा नवीन काहीतरी दयावं अशी आवड निर्माण झाली. त्याच्यात असलेले गूण त्याला स्वस्थ बसु देत नव्हते.
वयाच्या १६ व्या वर्षी कळमगांव येथे दंडारीमध्ये तो नायक म्हणून काम केला प्रेक्षकांना त्याचे गित आणि अभिनय आवडू लागले, पण वय कमी व शिक्षण सूरू असल्याने त्याला बाहेर कूठही प्रशिक्षण घेता आले नाही. त्यामुळे तो गावापुरताच मर्यादीत राहीला. ३ वर्षाचा काळ निघून गेला आणि ३० नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याच्याच गांवी रंगकर्मी रंगभुमी वडसा निर्मित "रक्तानं रंगली राखी " हे नाटक बूक झालं.
तर झाडीपट्टी रंगभुमी चे जेष्ठ कलावंत के रविकुमार हे त्याच्या ओळखीचे असल्याने त्याला तिथं छोटीशी भुमीका मिळाली आणि तिथून त्याच्या नाटकाची सुरुवात झाली. हळू हळू प्रयोग सहायक तर कधी छोटेमोठे रोल मिळायचे त्यातच तो समाधानी असायचा. त्यातून त्याची ओळख वाढवत गेला. १९ फ्रेब्रुवारी २०२५ ला गांवी शिव जयंती निमित्य अनेक धार्मिक गित सादर करीत असल्यामुळे त्याचा आवाज व गायकी लोकांना आवडू लागली. आणि तो सोशल मिडीया वर वायरल झाला.
तिरुमला नाट्य रंगभुमीचे कलावंत यांच्याशी संपर्क साधून २०२५ - २६ च्या सत्रात नायकाची भुमिका साकारण्याचा पहीला मान मिळाला.त्यानंतर झाडीपट्टीचे जेष्ट नाट्यलेखक पुंडलीक भांडेकर नाटकात प्रयोग सहाय्यक म्हणून काम पाहता पाहता त्यांच्या आक्रोश सुहासिनीचा या नाटकात नायक व गायक साकारून रंगभुमीवर कलेची दमदार सुरुवात झाली. गरीबी एक अंत या नाटकात सुद्धा नाटकात प्रेक्षक त्याच्या गायनाला व अभिनयाला डोक्यावर घेऊ लागले. जेष्ठ लेखक पुंडलीक भांडेकर यांनी स्वतःचे गाव कुनघाडा रै येथे निवडक नटसंचात स्व वेदांत पुंडलिक भांडेकर समर्पित कु गायत्री पुंडलिक भांडेकर संकल्पीत संगीत "लग्नगाठ " नाटकाचे आयोजन करून नायक म्हणून उभे केले.
असता नाटकात माझी बहीण लाडाची तू आहे गुणाची तू मोठ्या मनाची या गाण्याला प्रेक्षकांनी चक्क डोक्यावर घेतले. व अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आले होते. ओढ लागली जीवाला हे प्रेम गीत सुद्धा त्याच ताकदीने गाऊ लागला आणि लोकांना ते पसंत पडले. विशेष म्हणजे झाडीपट्टी नाटकाची सुरुवात नांदी पासून होत असते. मृदुंग वाजे ताल स्वरात .. थुई थुई नाचते गणराया या नांदीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडणारा कलावंत म्हणजे प्रशांतकुमार होय.
त्याच्या यशस्वितेसाठी जेष्ठ नाट्यलेखक सिद्धार्थ गोवर्ध, जेष्ठ नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर, जेष्ठ कलावंत पी लालचंद, के रवी, किशोर धुळशे, होमदेव कोसमशिल्ले, निकेश खोबरे , दिलखुश कुनघाडकर, अनिल मिसार, दशरथ कोहपरे, दिनकर सोनटक्के, शाम चौधरी ,विजय गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.

