सूर्याच्या प्रखर उष्णतेतही शेड अभावी चितेला भर उन्हातअग्नी द्यावा लागतो.

सूर्याच्या प्रखर उष्णतेतही शेड अभावी चितेला भर उन्हातअग्नी द्यावा लागतो.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर पिंपळगांव (भोसले) रोडवर असलेल्या अ-हेरनवरगांव येथील हाकेच्या अंतरावरील स्मशानभूमीत योग्य असे शेड नसल्यामुळे गावातील जनतेला सूर्याच्या वाढत्या तापमानात उघड्यावरती भर उन्हात उभे राहून चितेला अग्नि द्यावा लागतो.

स्मशान भूमीतील हातपंप नादुरुस्त असल्यामुळे अग्नी दिलेल्या चीतेला थंड करण्यासाठी टँकर ने पाणी आणून अस्थिराख थंड करावी लागते.स्मशानभूमीत अंतयात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी योग्य अशी जागा नसल्यामुळे तसेच शोकसभा घेण्यासाठी सभागृहाची व्यवस्था नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त मोकळ्या जागेत लोकांना ताटकळत उभे राहावे लागते. 

स्मशानभूमीत येणाऱ्या अंतयात्रेतील नागरिकांना बसण्यासाठी व शोकसभा घेण्यासाठी सभागृहाची नितांतआवश्यकता असल्यामुळे ग्रामपंचायत ने ते बांधकाम करावे. स्मशानभूमीत येणाऱ्या प्रेताची विधीवत पूजा करण्यासाठी आणि अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आंघोळ करण्यासाठी दोन टाक्याचे बांधकाम करावेत जेणेकरून सदैव त्या टाक्यांमध्ये पाणी मुबलक जमा करून ठेवता येईल.

स्मशानभूमीच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधल्या गेली तर स्मशानभूमीच्या आत मध्ये कोणीही शौचास जाणार नाही आणि मेलेली जनावरे उघड्यावर टाकणार नाहीत. त्यासाठी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधावी अशाही ग्रामवासीयांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. 

सदर स्मशानभूमीत असलेल्या गैरसोयींची परिपुर्तता करण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे.स्मशानभूमीतील असलेल्या गैरसोयीकडे नागरिकांकडुन खूप संताप ग्रामपंचायत प्रति व्यक्त केल्या जात आहे. 

स्मशानभूमीतील गैरसोईकडे ग्रामपंचायत ने लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी आणि ग्रामसभेचा ठराव घेऊन लवकरात लवकर स्मशानभूमी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अ-हेरनवरगांव येथील जनतेची मागणी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !