धानोरा जवळ खासगी बस उलटली ; १८ प्रवासी जखमी,३ जणांची प्रकृती गंभीर.

धानोरा जवळ खासगी बस उलटली ; १८ प्रवासी जखमी,३ जणांची प्रकृती गंभीर.


एस.के.24 तास 


धानोरा : धानोरा - मुरूमगाव मार्गावरील वडगांजवळ रविवारी (दि.२४) एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली, ज्यामध्ये १८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दल्ली येथून गडचिरोलीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र. सीजी ०८ एम ०३८८) रविवारी दुपारी १२:४५ च्या सुमारास वडगांजवळ पोहोचली असता अनियंत्रित होऊन उलटली. बसमध्ये चालक-वाहकासह एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते

गंभीर जखमी : - नीलकंठ वाडके (५८, मारोडा), चांदनी रामटेके (२३, तोरगाव) आणि चालक रवी चावरे (३५, दल्ली, छत्तीसगड).कृष निमगडे, बंडू खोब्रागडे, मिस्टी नरोटे, चांदनी साहू, पंचराम पटेल, देवदास झगराह, उदय देवांगण, ललिता साहू, जानको पोया, लता नरोटे, भूपेंद्र साहू, गुलाबो पटेल, शेखर उईके, गोपीचंद कुणबी आणि प्रदीप गावडे.

अपघाताची माहिती मिळताच धानोरा पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी गडचिरोलीला रेफर करण्यात आले आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने बसचा वेग कमी होता. तसेच, बस उलटल्यानंतर एका झाडाला अडकल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान, चालकाने मद्यप्राशन केल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !