Skip to main content

पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली,पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत ; शेतकरी नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

 


पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली,पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत ; शेतकरी नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.


एस.के.24 तास न्युज नेटवर्क


नागपूर : शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे.पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत जावे लागले.


यावेळी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, रस्ते मोकळे करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात. या दुहेरी निकषाबद्दल त्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते. 

नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलक काल रात्रीभर मुक्काम ठोकत आणि आज ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे आज दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

आज सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, राज्य सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पकंज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

काही आंदोलकांनी आसपासच्या शेतात, मोकळ्या जागेत तसेच एनएचएआयतर्फे विकसित केलेल्या ऑक्सीजन-बर्ड पार्कमध्ये प्रवेश करून तेथे ठिय्या दिला आहे. काही शेतकरी विश्रांती घेत असताना, इतरांनी मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. 

या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण मिळाले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन छेडले. त्यामुळे दिवसभर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Popular posts from this blog

नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी.

💥नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी. ✍️सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक गडचिरोली : नवेगाव (मुरखळा) गावाजवळ दिनांक,21 मे 2026 गुरुवार रोजी सकाळी 7:15 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला.चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत 2 प्रवाशाचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार,​ख्वाजा शाहबूद वय,70 वर्ष व लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय,60 वर्ष नवरगाव ता.सिंदेवाही जिल्हा.चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर शिवांश स्वप्नील नवघरे 7 महिने  हा बालक गंभीर जखमी आहे.गडचिरोली - उमरखेड बस MH.14 BT - 0740 नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बस गडचिरोली डेपोतून उमरखेडसाठी निघाली होती.बस प्रवाशांनी खचाखच भरल...

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात. एस.के.24 तास गडचिरोली : दिनांक,07 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे च्या सुमारास आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती.यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला.  तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तात्काळ हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.  सविस्तर वृत्त असे आहे की,दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी मौजा काटली,ता.जि. गडचिरोली येथील काही मुले पहाटे 04:00 वा. च्या सुमारास काटली ते नगरी फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरीता गेले होते.यावेळी सुमारे 05:00 वा. चे दरम्यान गडचिरोली ते आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणा­या ट्रकने व्यायाम करणा­या 06 मुलांना चिरडले होते.  या मध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यु झाला होता.तसेच इतर चार मुले जखमी झाले होते. जखमी मुलांना तात्काळ रुग्णवाहीकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात...

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी.

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी. सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक                                  (एस.के.24 तास) गडचिरोली : गडचिरोली पोर्ला मुख्य मार्गावरील काटली च्या नाल्याजवळ मार्निंग वॉक करीता गेलेले 6 युवकापैकी दोघाला आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने उडविले असुन 2 युवकांचा जागीच ठार झाले. आज दिनांक 7 ऑगष्ट 2025 ला सकाळी 5.30 चे दरम्यान काटलीचे 6 युवक मित्र नित्याप्रमाणे काटलीच्या नाल्याजवळ वायाम करण्याकरीता गेले असता आरमोरी वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या फोर व्हिलर गाडीने सहापैकी पिंकु नामदेव भोयर वय,14 वर्ष काटली,तन्मय बालाजी मानकर वय,16 वर्ष काटली यांना उडविल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यु झाला.  क्षितिज तुळनिदास मेश्राम,आदित्य धनजंय कोहपते, दिशांत दुर्याधन मेश्राम,तुषार राजेंद्र मारबते हे 4 जन गंभीर जखमी आहेत. सदरची वार्ता कळताच काटली - साखरा, पोर्ला च्या नागर...