ब्रेकिंग न्युज...
मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक (एस.के.24 तास)
गडचिरोली : गडचिरोली पोर्ला मुख्य मार्गावरील काटली च्या नाल्याजवळ मार्निंग वॉक करीता गेलेले 6 युवकापैकी दोघाला आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने उडविले असुन 2 युवकांचा जागीच ठार झाले.
आज दिनांक 7 ऑगष्ट 2025 ला सकाळी 5.30 चे दरम्यान काटलीचे 6 युवक मित्र नित्याप्रमाणे काटलीच्या नाल्याजवळ वायाम करण्याकरीता गेले असता आरमोरी वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या फोर व्हिलर गाडीने सहापैकी पिंकु नामदेव भोयर वय,14 वर्ष काटली,तन्मय बालाजी मानकर वय,16 वर्ष काटली यांना उडविल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यु झाला.
क्षितिज तुळनिदास मेश्राम,आदित्य धनजंय कोहपते, दिशांत दुर्याधन मेश्राम,तुषार राजेंद्र मारबते हे 4 जन गंभीर जखमी आहेत.
सदरची वार्ता कळताच काटली - साखरा, पोर्ला च्या नागरिकांची गर्दी जमली.गडचिरोली पोलीसांना माहीती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य व अधिक तपास सुरु आहे.