💥नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली.
📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी.
✍️सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : नवेगाव (मुरखळा) गावाजवळ दिनांक,21 मे 2026 गुरुवार रोजी सकाळी 7:15 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला.चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली.
या दुर्दैवी घटनेत 2 प्रवाशाचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.प्राथमिक माहितीनुसार,ख्वाजा शाहबूद वय,70 वर्ष व लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय,60 वर्ष नवरगाव ता.सिंदेवाही जिल्हा.चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
तर शिवांश स्वप्नील नवघरे 7 महिने हा बालक गंभीर जखमी आहे.गडचिरोली - उमरखेड बस MH.14 BT - 0740 नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती.
आज सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बस गडचिरोली डेपोतून उमरखेडसाठी निघाली होती.बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.गडचिरोलीजवळील मुरखाला गाव परिसरात पोहोचल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले, ज्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. बस उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.या भीषण अपघातात ख्वाजा शहाबुद्दीन नावाच्या एका वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. एका तरुण मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णवाहिकेने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
जखमी प्रवाशांची नावे : -
धनश्री ललित चांदेकर,आशिष संघपाल साखरकर,मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे आणि ज्योती अविनाश पाल (गडचिरोली),श्रीहरी खडकर आणि बेबीबाई श्रीहरी खळकर (दोघे.रा.रामनगर, गडचिरोली),चैतन्य मारुती मेडीवार,तानिया मारुती मेडीवार,वैशाली मारुती मेडीवार,रूपाली खनके,ललिता यशवंत खणके,ऋषभ निळकंठ खडके, सचिन शामराव वाळके (सर्व रा.चंद्रपूर)
जयश्री सचिन वरभे,सचिन शामराव वरदे,जयश्री खाणके (सर्व रा.वरोरा जि.चंद्रपूर),रत्नाकर दादाजी राऊत,पार्थ गणेश राऊत (दोघेही रा.चांदली बूज),मंगला संजय कळसकर रा.नांदगाव, लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार,भूषण नरेश दुर्कीवार (रा.नवरगाव ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर)
चालक रोहित देशमुख (रा.अकोला), वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे (सर्व रा.वणी जि.यवतमाळ),श्वेता स्वप्निल नवघडे (रा.चामोर्शी), डॉ.गणेश जैन (रा.त्रिमूर्ती चौक, गडचिरोली), सुमन नामदेव कत्तलवार (गडचिरोली)
व्यंकट नरेश ढगे (नवेगाव ता.गडचिरोली), अश्विनी लक्ष्मण तोरपे (रा.कांदोळी ता.कुरखेडा),किशोर कुमाजी गावतुरे (रा.कारवाफा ता. धानोरा), गौरव यशवंतराव कुमरे (रा.गोंदिया) यांचा जखमींत समावेश आहे.

