काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,07 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे च्या सुमारास आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती.यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला.
तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तात्काळ हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे आहे की,दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी मौजा काटली,ता.जि. गडचिरोली येथील काही मुले पहाटे 04:00 वा. च्या सुमारास काटली ते नगरी फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरीता गेले होते.यावेळी सुमारे 05:00 वा. चे दरम्यान गडचिरोली ते आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणाया ट्रकने व्यायाम करणाया 06 मुलांना चिरडले होते.
या मध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यु झाला होता.तसेच इतर चार मुले जखमी झाले होते. जखमी मुलांना तात्काळ रुग्णवाहीकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता.तसेच इतर जखमी मुले वय 13 वर्षे आणि 14 वर्षे यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तात्काळ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.
सदर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सद्यस्थितीत दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे.सदर गुन्ह्राच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे अप. क्र. 0637/2025 सदोष मनुष्यवध (कलम 105 भान्यासं) यासह कलम 281, 125 (ए), 125 (बी) भान्यासं आणि कलम 134, 187, 184 मोटार वाहन अधिनियम अन्वये अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकायांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती.सदर आव्हानात्मक अशा स्वरुपाच्या गुन्ह्राच्या तपासादरम्यान पोलीस पथकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
सिसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्रातील ट्रकचा अत्यंत निपुणतेने शोध घेतला तसेच न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथील पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या मदतीने सदर ट्रकचा गुन्ह्रामधील सहभाग निष्पन्न करुन सदर वाहनाला छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी ट्रक चालक नामे -
1) प्रविण बाळकृष्ण कोल्हे वय,26 वर्ष,रा. चिचगड, ता. देवरी,जि. गोंदिया
सहचालक 2) सुनिल श्रीराम मारगाये वय,47 वर्ष रा. चिचगड,ता.देवरी.जि.गोंदिया
यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना मा.न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून,पोस्टे गडचिरोलीचे पोनि.विनोद चव्हाण हे गुन्ह्राचा पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,गडचिरोली
श्री.सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीचे अधिकारी व अंमलदार तसेच स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे आणि अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.