Skip to main content

आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश. 📍1,251 किलो अमली पदार्थ (गांजा) जप्त 6.25 कोटी रुपये अमली पदार्थासह 4 जणांना अटक.

आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश.


📍1,251 किलो अमली पदार्थ (गांजा) जप्त 6.25 कोटी रुपये अमली पदार्थासह 4 जणांना अटक.


एस.के.24 तास 


नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) नागपूर प्रादेशिक पथकाने आंतरराज्य गांजा तस्करी साखळीचा पर्दाफाश करत सलग दोन कारवायांत तब्बल 1,251 किलो अमलीपदार्थ (गांजा) जप्त केला.सुमारे 6.25 कोटी रुपये बाजार मूल्याच्या या अमली पदार्थासह 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यात मुख्य सूत्रधाराचाही समावेश आहे.

डीआरआयने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ओडिशा - आंध्रप्रदेश सीमेवरून मध्यप्रदेश - राजस्थान सीमेच्या दिशेने जाणारे बोलेरो पिकअप वाहन अडवले.झडतीदरम्यान 53 गोणपाटांच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेली 142 पॅकेजेस आढळली.त्यातून 729 किलो गांजा जप्त करण्यात आला. 

हा गांजा कच्च्या आल्याच्या पोत्यांमध्ये कुशलतेने दडवण्यात आला होता.सुमारे 3.64 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल,वाहन आणि आच्छादनासाठी वापरलेला माल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली.अटकेत असलेल्यांपैकी 1 जण यापूर्वीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून तो बराच काळ फरार होता.

याआधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 वरील भगिमाहरी टोल प्लाझाजवळ ओडिशाहून येणारा एक ट्रक अडवण्यात आला होता. ट्रक मध्ये कुलर, टेबल फॅन आणि ब्लँकेट्सच्या मालाखाली 100 पॅकेजेसमध्ये 523 किलो गांजा लपवण्यात आला होता.सुमारे 2.61 कोटी रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला.या प्रकरणीही दोघांना अटक करण्यात आली.

दोन्ही कारवाया अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 (एनडीपीएस) अंतर्गत करण्यात आल्या. ओडिशा–आंध्रप्रदेश सीमेलगतच्या भागातून गांजाची खरेदी करून तो मध्यप्रदेशमार्गे राजस्थानसह उत्तर भारतात पोहोचवण्याची टोळीची कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

वाहतुकीदरम्यान भाजीपाला,घरगुती उपकरणे आदी कायदेशीर मालाच्या आड गांजाची तस्करी केली जात होती.सलग आणि समन्वित कारवायांमुळे आंतरराज्य अमली पदार्थ जाळ्यावर मोठा आघात बसल्याचे डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या " नशामुक्त भारत " या ध्येयाशी सुसंगतपणे अमली पदार्थ तस्करी विरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.तपास सुरू असून या साखळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Popular posts from this blog

नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी.

💥नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी. ✍️सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक गडचिरोली : नवेगाव (मुरखळा) गावाजवळ दिनांक,21 मे 2026 गुरुवार रोजी सकाळी 7:15 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला.चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत 2 प्रवाशाचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार,​ख्वाजा शाहबूद वय,70 वर्ष व लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय,60 वर्ष नवरगाव ता.सिंदेवाही जिल्हा.चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर शिवांश स्वप्नील नवघरे 7 महिने  हा बालक गंभीर जखमी आहे.गडचिरोली - उमरखेड बस MH.14 BT - 0740 नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बस गडचिरोली डेपोतून उमरखेडसाठी निघाली होती.बस प्रवाशांनी खचाखच भरल...

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात. एस.के.24 तास गडचिरोली : दिनांक,07 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे च्या सुमारास आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती.यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला.  तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तात्काळ हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.  सविस्तर वृत्त असे आहे की,दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी मौजा काटली,ता.जि. गडचिरोली येथील काही मुले पहाटे 04:00 वा. च्या सुमारास काटली ते नगरी फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरीता गेले होते.यावेळी सुमारे 05:00 वा. चे दरम्यान गडचिरोली ते आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणा­या ट्रकने व्यायाम करणा­या 06 मुलांना चिरडले होते.  या मध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यु झाला होता.तसेच इतर चार मुले जखमी झाले होते. जखमी मुलांना तात्काळ रुग्णवाहीकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात...

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी.

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी. सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक                                  (एस.के.24 तास) गडचिरोली : गडचिरोली पोर्ला मुख्य मार्गावरील काटली च्या नाल्याजवळ मार्निंग वॉक करीता गेलेले 6 युवकापैकी दोघाला आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने उडविले असुन 2 युवकांचा जागीच ठार झाले. आज दिनांक 7 ऑगष्ट 2025 ला सकाळी 5.30 चे दरम्यान काटलीचे 6 युवक मित्र नित्याप्रमाणे काटलीच्या नाल्याजवळ वायाम करण्याकरीता गेले असता आरमोरी वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या फोर व्हिलर गाडीने सहापैकी पिंकु नामदेव भोयर वय,14 वर्ष काटली,तन्मय बालाजी मानकर वय,16 वर्ष काटली यांना उडविल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यु झाला.  क्षितिज तुळनिदास मेश्राम,आदित्य धनजंय कोहपते, दिशांत दुर्याधन मेश्राम,तुषार राजेंद्र मारबते हे 4 जन गंभीर जखमी आहेत. सदरची वार्ता कळताच काटली - साखरा, पोर्ला च्या नागर...