Skip to main content

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोट ; 16 जण मृत्यूमुखी. 📍ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोट ; 16 जण मृत्यूमुखी.


📍ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.


एस.के.24 तास 


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या SBL कंपनीत भीषण स्फोट होऊन सर्वच कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलीस व जिल्हा प्रशासन घटनास्थळी आहे. प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी युद्धपातळीवर कार्यरत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राऊळगाव येथील ‘एसबीएल’ कंपनीत खाणकामासाठी लागणारे डिटोनेटर व इतर स्फोटके तयार केली जातात. कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याचीही माहिती मिळत आहे. धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले होते.


घटनेच्या वेळी संबंधित विभागात सुमारे ३५ कामगार काम करत होते. स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे आणि ढिगाऱ्यामुळे काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहाचा जवळजवळ कोळसा झाला आहे.


प्रशासनाची धाव, बचावकार्य वेगात


घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण


भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जखमी कामगारांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा सुरू आहे.घटनेमुळे काटोल तालुका हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Popular posts from this blog

नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी.

💥नवेगाव (मुरखळा) गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली एस.टी.बस उलटली. 📍7 महिन्याच्या चिमुकल्यासह 3 ठार, तर 33 प्रवासी जखमी. ✍️सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक गडचिरोली : नवेगाव (मुरखळा) गावाजवळ दिनांक,21 मे 2026 गुरुवार रोजी सकाळी 7:15 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला.चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत 2 प्रवाशाचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत.यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार,​ख्वाजा शाहबूद वय,70 वर्ष व लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय,60 वर्ष नवरगाव ता.सिंदेवाही जिल्हा.चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर शिवांश स्वप्नील नवघरे 7 महिने  हा बालक गंभीर जखमी आहे.गडचिरोली - उमरखेड बस MH.14 BT - 0740 नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बस गडचिरोली डेपोतून उमरखेडसाठी निघाली होती.बस प्रवाशांनी खचाखच भरल...

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.

काटली येथील अपघातात 4 मुलांच्या मृत्युस कारणीभूत ट्रक चालकास 48 तासात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात. एस.के.24 तास गडचिरोली : दिनांक,07 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे च्या सुमारास आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती.यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला.  तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तात्काळ हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.  सविस्तर वृत्त असे आहे की,दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी मौजा काटली,ता.जि. गडचिरोली येथील काही मुले पहाटे 04:00 वा. च्या सुमारास काटली ते नगरी फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरीता गेले होते.यावेळी सुमारे 05:00 वा. चे दरम्यान गडचिरोली ते आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणा­या ट्रकने व्यायाम करणा­या 06 मुलांना चिरडले होते.  या मध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यु झाला होता.तसेच इतर चार मुले जखमी झाले होते. जखमी मुलांना तात्काळ रुग्णवाहीकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात...

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी.

ब्रेकिंग न्युज... मार्निंग वॉक करीता गेलेल्या युवकांना आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने धडक दिल्याने 2 युवक जागीच ठार ; 4 जण गंभीर जखमी. सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक                                  (एस.के.24 तास) गडचिरोली : गडचिरोली पोर्ला मुख्य मार्गावरील काटली च्या नाल्याजवळ मार्निंग वॉक करीता गेलेले 6 युवकापैकी दोघाला आरमोरी वरून गडचिरोली कडे येणारी फोर व्हिलर गाडीने उडविले असुन 2 युवकांचा जागीच ठार झाले. आज दिनांक 7 ऑगष्ट 2025 ला सकाळी 5.30 चे दरम्यान काटलीचे 6 युवक मित्र नित्याप्रमाणे काटलीच्या नाल्याजवळ वायाम करण्याकरीता गेले असता आरमोरी वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या फोर व्हिलर गाडीने सहापैकी पिंकु नामदेव भोयर वय,14 वर्ष काटली,तन्मय बालाजी मानकर वय,16 वर्ष काटली यांना उडविल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यु झाला.  क्षितिज तुळनिदास मेश्राम,आदित्य धनजंय कोहपते, दिशांत दुर्याधन मेश्राम,तुषार राजेंद्र मारबते हे 4 जन गंभीर जखमी आहेत. सदरची वार्ता कळताच काटली - साखरा, पोर्ला च्या नागर...