रिपाई च्या समर्थना शिवाय मविआ जिंकणे सोपे नाही. - सिध्दार्थ सुमन

रिपाई च्या समर्थना शिवाय मविआ जिंकणे सोपे नाही. - सिध्दार्थ सुमन


मुनिश्वर बोरकर 


चंद्रपुर : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत म.वि.आ.वा काँग्रेस ने रि.पा.ई.पक्षांला दुर ठेवले असल्यामुळे ही निवडणुक म.वि.आ.वा काँग्रसला जिंकणे अवघड जाणार आहे. महाराष्टात रि.पा.ई.च्या समर्थना शिवाय  म.वि.आ.ला गढ जिंकणे सोपे नसल्याचे मत रिपा.ई.चे नागपुर प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सुमन यांनी चंद्रपुर व गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रात रिपाइं ची भुमिका काय ? 


हे जाणुन घेण्यासाठी आयोजित बैठकीत व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष,गोपाल रायपुरे हे होते. बैठकीत महासचिव मोरेश्वर चंदनखेडे, कार्याध्यक्ष लाजर कांबळे, उपाध्यक्ष कोमल रामटेके, कोषाध्यक्ष गुरुदास रामटेके,अजय चव्हाण, अनिल वानखेडे, अजय पाटील, अश्विन दुबे, अरुण देवगडे, स्वरुप भगत,रामटेके,धोटे इत्यादींनी विचार व्यक्त केले. 


 ते पुढे म्हणाले की रिपब्लीकन पार्टी आँफ इंडीया हा मुळ पक्ष असुन स्मृतीशेष दादासाहेब गवई यांनी जातीयवादी व धर्मांध शक्ती विरोधात  नेहमीच काँग्रेस वा तत्सम पुरोगामी विचारांच्या पक्षाना  सहकार्य केलेले आहे. रिपब्लीकन मतदार संविधान समर्थक आणि समतेचा पुरस्कर्ता आहे. तो विषमतावादी राजकिय विचार मतप्रवाहा विरोधात मतदान करित असतो. म्हणुनच तो पारंपरिक द्रृष्ट्या काँग्रेसचा मतदार म्हणुन ओळखल्या जातो. परंतु मागिल काही वर्षात काँग्रेसने रिपाई नेतृत्वाची उपेक्षा केल्यामुळे तो काँग्रेस पासुन दुर जात आहे. याचा मोठा फटका काँग्रेसला बसत आहे.

     

रिपब्लीकन मतदाराने पर्याय म्हणुन बसपा कडे कल वळविला. परंतु बसपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व या मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडले. शिवाय रिपाईच्या गटा- तटावर बोट ठेवुन उभी राहिलेल्या बसपातुन बाहेर पडलेल्या कँडरबेस नेत्यांनी आप आपले वेगळे पक्ष निर्माण केले.त्यामुळे आंबेडकरी मतदारांचा भ्रमनिराश झाला व पुनश्च तो मतदार रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाची चर्चा करीत आहे. 

    

अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानी व स्वतंत्र बाण्याचे राजकारण म्हणुन वंचितची निर्मिती केली. 2019  च्या लोकसभा निवडणुकीत मतदरा़नी भरभरुन वंचितला साथ दिली. त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला  व भाजप युतीला फायदा झाला.  यावेळेसही  वंचितने स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भाजपलाच होईल अशी चर्चा आंबेडकरी मतदारांमधे आहे.असे असले तरी बसपा व वंचितचा उमेदवार काँग्रेस करीता अडचणीचे ठरु शकतात.अशा स्थितीत रिपाइंची भुमिका महत्वपुर्ण ठरणार आहे. 

     

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपुर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार बाळुभाऊ धानोरकर यांना रिपाईने पुर्ण सहकार्य केले. परिणामी बाळुभाऊ धानोरकर विजयी झाले आणी कांग्रेसला महाराष्ट्रात एक जागा जिंकता आली. तसेच विधान सभा निवडणुकीतही काँग्रेसला च रिपाईची चांगली साथ मिळाली व कांग्रेसला चंद्रपुर जिल्ह्यातील सहा पैकी तीन विधान सभा जिंकता आल्या. 

     

महाराष्ट्रात रिपब्लीकन मतदार संविधानाचे संरक्षण व धर्मांध शक्तिचा पराभव करण्या करिता म. वि. आ. च्या पाठीशी उभा राहु शकतो.परंतु त्या करीता काँग्रेसच्या उमेदवारांना रिपब्लीकन पार्टी आँफ इंडियाला सन्मानाने सोबत घ्यावे लागेल. अन्यथा काँग्रेस वा म. वि. आ. ला गड जिंकणे सोपे नाही. असेही ते म्हणाले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !