ब्रेकिंग न्युज...
सावली येथे गणपती विसर्जन दरम्यान दोन सख्या भावंडांचा व एका युवकाचा बुडून मृत्यू.★ सावली येथे शोककळा.
एस.के.24 तास
सावली : काल सावली येथील गणपती विसर्जन असल्याने जय बजरंग युवा गणेश मंडळाने आपला गणपती सावलीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेला असोला मेंढा नहारावर रात्रौ.10:30. वा. पाच युवक नहारात उतरून गणपती विसर्जन करताना पाच युवक पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नहरामध्ये बुडाल्याने " रोहित येलकलवार व सत्यवान कोठारे " हे कसेबसे बाहेर निघता आले.
पण काही युवक बुडाल्याने गावकरी व पोलीस प्रशासनाने युवकांच्या काढण्यास प्रयत्न केले.असतास गुरुदास उर्फ सचिन दिवाकर मोहुर्ले वय,33 वर्ष याला नहाराच्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले.
असल्यास त्याला मृत घोषित करण्यात आले.व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सख्खे भाऊ निकेश हरिभाऊ गुंडावार वय,30 वर्षे व संदीप हरिभाऊ गुंडावार वय,27 वर्ष आहे मिळाले नसून सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार,आशिष बोरकर साहेब व त्यांच्या चमुने शोधकार्य सुरू आहे.