मुग्दाई प्रेरणास्थळावर साजरा होणार " जागतिक आदिवासी दिन "

मुग्दाई प्रेरणास्थळावर साजरा होणार " जागतिक आदिवासी दिन "


एस.के.24 तास


चिमुर : संयुक्त राष्ट्रसंघामार्फत घोषित 9 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच धरतीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेरणादायी वीरांगणा मुग्दाई आदिवासी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या दिवशी चिमूर तालुक्यातील डोमा येथे मुग्दाई प्रेरणास्थळावर जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून वाघाच्या दहशतीमुळे मुग्दाई प्रेरणास्थळ व धबधबा पर्यटकांसाठी व भाविकासाठी बंद करण्यात आला होता. या मुग्दाई प्रेरणास्थळावर हजारो आदिवासी आणि सर्व पारंपरिक वननिवासी लोकांची श्रद्धा आहे.


 परंतु वाघाच्या दहशतीमुळे वनविभागाने लादलेल्या निर्बंधामुळे गेल्या महिन्याभरापासून मुग्दाई धबधबा आणि प्रेरणास्थळ बंदण्यात आले आहे. या निर्बंधामुळे स्थानिक नागरिक, हजारो वाहतूकदार, धंदेवाहिक व्यावसायिक यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु आतापर्यंत वाघाला जेरबंद करण्यात आले नाही. याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रेरणास्थळामध्ये धबधबा असल्यामुळे हजारो पर्यटक प्रत्येक दिवशी येथे भेट देत असतात. 


या पर्यटकांमुळे येथील स्थानिक  लोकांना व्यवसायाचे, धंद्याचे, रोजगराचे साधन उपलब्ध झाले होते. हजारो कुटुंबाची उपजीविका या पर्यटनावर अवलंबून आहे. परंतु वनविभागाच्या निर्बंधामुळे हजारो लोकांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या उघड्यावर पडले आहे. 


आता नुकतेच मुग्दाई ट्रस्टला वनविभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. यामध्ये वनविभागाने पत्राद्वारे "मुग्दाई पर्यटनमधील वाघाची दहशत संपेपर्यंत धबधबा बंद ठेवून या विभागाला सहकार्य करावे. अन्यथा धबधबा सुरू ठेवल्यास मानवी वन्य जीव संघर्षाच्या घटना घडल्या तर सदर घटनेस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल.याची गंभीरतेने दखल घ्यावी" असे कळवले आहे.


 वन विभागाच्या या टिपणीबाबत मुग्दाई ट्रस्टने संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या असून मुग्दाई देवस्थानाचे सर्वे क्रमांक 321 चे 323 हेक्टरचे व वनक्षेत्र 423 हेक्टर असे एकूण 746 हेक्टरचा डोमा गावाला वनहक्क कायदा 2006 नुसार समूहिक वनहक्क दावा मंजूर होऊन त्याचा अभिलेख ग्रामसभेला प्राप्त झाला आहे. त्यावर मुग्दाई देवस्थान आणि डोमा वाशीयांचा संपूर्ण अधिकार आहे.वाघाची व्यवस्थापन व बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सहकार्य करावे जबाबदारी ही वनविभागाची आहे. असे स्थानिक नागरिकांचे व ट्रस्टचे म्हणणे आहे.


 मुग्दाई ट्रस्टने प्रेरणास्थळावर वृक्षारोपण करून व आदिवासी महापुरुषांना वंदन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यादरम्यान वन प्राण्यापासून भक्तांचे संरक्षण व्हावे याकरिता ट्रस्टच्या वतीने स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे. होण्याकरिता त्यामुळे मुग्दाई प्रेरनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक आदिवासींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !