विज पडून युवा शेतकरी ठार मूल तालुक्यातील दहेगांव येथील घटना.

 

विज पडून युवा शेतकरी ठार मूल तालुक्यातील दहेगांव येथील घटना.



एस.के.24 तास

मुल : तालुक्यातील दहेगांव येथील विलास रामुजी आलाम यांच्यावर दुपारी 1 वाजता दरम्यान विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना दहेगांव शेतशिवारात घडली.

मूल तालुक्यातील मौजा दहेगांव येथील विलास रामुजी आलाम वय 42 वर्षे यांचे नावाने चक दहेगाव शेत शिवारामध्ये शेती आहे. तो शेतात जावुन शेतकाम करीत असताना आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला, याचवेळी विलास आलाम यांच्यावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !