गडचिरोली जवळील वाकडी च्या महिलेला वाघाने केले ठार.

गडचिरोली जवळील वाकडी च्या महिलेला वाघाने केले ठार.

एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली वरून अवघ्या पाच किलो मि. अंतरावरील वाकडी येथील एका महिलेला वाघाने पकडून ठार केल्याची घटना आज दि. 3 जानेवारी १२ वाजता चे दरम्यान घडली. 


मंगला बोळे रा.वाकडी वय,५० वर्ष हि शेतावर गेली असता ती जंगलाच्या बाजुने काळ्या तोडण्या करीता गेली झुडपात दबा धरून बसलेल्या मंगला हिला वाघाने पकडून ठार केल्याची आजची ताजी घटना घडली.गावकऱ्यांनी वनविभाग व पोलिस स्टेशन गडचिरोली येथे माहीती दिली असता वनविभाग कर्मचारी व गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहचले.पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. 


तिच्या पश्चात दोन मुले असुन पती मात्र निफ्रद्रा (निमगाव) येथे राहत असुन तिच्या मृत्यु मुळे वाकडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन. यापूर्वी हिरापुर गावातील महिलेला सुध्या वाघाने ठार केले होते.सदर परिसरात वाघाची दहशत पसरली असुन सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !