मोहाळी च्या करण दोडके ची आय.आय.टी.साठी निवड.

2 minute read

मोहाळी च्या करण दोडके ची आय.आय.टी.साठी निवड.


एस.के.24 तास

 

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी (नलेश्वर)  येथील करण दोडके या विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये निवड झालेली आहे. तिथे तो डेव्हलपमेंट स्टडीज या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. 29 मे रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये करणची देश भरातून 12 विद्यार्थ्यांमध्ये निवड झालेली असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

भारतामध्ये एकूण 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्था शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणे ही अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते.विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जेईई सारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. 

तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनाच या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. असा समज प्रचलित आहे. परंतु कला व इतर शाखेमध्ये शिक्षण झालेल्यांना सुद्धा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवता येतो. याबाबत ग्रामीण भागात अनभिज्ञता आहे. परंतु करण च्या या आयटीमधीलल निवडीमुळेया गैरसमजाला तडा गेलेला आहे. एका ग्रामीण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांची या संस्थेत शिक्षणासाठी निवड होणे म्हणजे अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेत करण दोन वर्षाचा पदव्युत्तर  अभ्यासक्रम पूर्ण करेल. 

करणचे प्राथमिकशिक्षण गावीच पूर्ण झाले व महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी माध्यमातून राजुरा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात राहून पूर्ण केले. त्यानंतर त्याने बनारस हिंदू विश्वविद्यालयात राज्यशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. स्वतःचे पदव्युत्तर शिक्षण त्याला नामांकित शैक्षणिक संस्थेमध्येच पूर्ण करायचे होते. या शिक्षणादरम्यानच त्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अजीम प्रेमजी यूनिवर्सिटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील पदव्युत्तर विषयांबद्दल माहिती झाली. 

त्यानंतर त्याने पदवी दरम्यान तयारी करून या सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षा दिल्या. मुलाखत झाल्यानंतर त्याची आयआयटी हैदराबाद येथे निवड झाली. त्याच्या या नावीन्यपूर्ण यशासाठी ब्राईट एज फाउंडेशन व नेचर फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच करण सारखा इतर विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग निवडावा आणि स्वतःच्या करिअरचा विचार करताना नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे हाच सुरुवातीचा पर्याय निवडावा आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

करणचे वडील वाल्मीक दोडके शेतकरी आहेत. ते मोहाडी येथे शेतीच करतात. करणने स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडून नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवलेला आहे. त्याचा या शिक्षणाचा उपयोग त्याला स्वतःच्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी करता येणार आहे. त्यामुळे त्याने या यशाचे श्रेय मोठा भाऊ,आई वडील, शिक्षक वृंद यांना दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !