⭕ 9 ऑगस्ट - क्रांतिदिनी झाडीपट्टीतील कलावंत करणार वडसा ( देसाईगंज, जि.- गडचिरोली ) येथे " रंगकर्मी आंदोलन "
➡️ टाळेबंदीमुळे झाडीपट्टीतील नाट्यप्रयोग आहेत बंद ; कलावंतांची होत आहे उपासमार !
▶️ सगळ्यांना निर्बंधातून सूट, मग कलावंतांवरच अन्याय का ? कलावंतांचा शासनाला सवाल !
वडसा : कोरोनाची दुसरी लाट ओसरताच शासन-प्रशासनाच्या वतीने राज्यात नुकतीच टाळेबंदी मध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने, मॉल, जीम, पार्लर सोबतच अनेक गोष्टी शिथील करण्यात आल्या.पण मात्र, शिथील करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासुन बंद पडलेले थिएटर्स,सांस्कृतीक कार्यक्रम, नाट्यप्रयोग ईत्यादींचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे समस्त कलावंतांच्या व्यथा, वेदना शासनापर्यंत पोहचाव्यात, सोबतच राज्यव्यापी होत असलेल्या रंगकर्मी आंदोलनाला पाठींबा म्हणून झाडीपट्टीतही आंदोलन व्हावे, याकरीता ४ आगष्टला ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत प्रमुख ऊपस्थीत जेष्ट कलावंत प्रा.डॉ.शेखर डोंगरे,अनिरुद्ध वनकर,मुकेश गेडाम, हीरालाल पेंटर,परमानंद गहाने, नीतु बुद्धे,ताजुल ऊके, किरपाल सयाम,या सोबतच अनेक कलावंतांनी आपले विचार व्यक्त केले.सभेचे सुत्रसंचालन भास्कर पींपळे यांनी केले. येत्या ९ ऑगस्ट ला झाडीपट्टीची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडसा येथे एक मोठे आंदोलन करावे असा उपस्थित सर्व कलावंतांनी एकमुखी निर्णय घेतला.
गेल्या अठरा महीन्यांपासुन टाळेबंदीमुळे झाडीपट्टीतीन नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे येथील कलावंतांचा रोजगार हिरावला गेला. झाडीपट्टीतील नाटकांच्या भरोश्यावरती कलावंतांसोबतच संगीतकार, नेपथ्यकार, डेकोरेशनवाले,आणि रंगभुमीत काम करणाऱ्या अनेकांचे ऊदरनिर्वाह हे नाट्यप्रयोगावरच अवलंबुन असल्यामुळे आज त्यांच्यावर ऊपासमारीची पाळी आलेली आहे. परंतु शासन-प्रशासनातर्फे त्यांची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही.