शेतात वीज कोसळून दोन महिला ठार ; पाच महिला जखमी.

शेतात वीज कोसळून दोन महिला ठार ; पाच महिला जखमी.


एस.के.24 तास न्युज नेटवर्क


नागपूर : नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने विश्रांती दिली होती.परंतु आता मागील दोन दिवसांपासून पून्हा अधून - मधून पाऊस पडत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे. 


नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये शेतीचे काम सुरू असतांना शुक्रवारी दुपारी नेहमी प्रमाने जेवणाची सुट्टी झाली.शेतात काम करणाऱ्या महिलांचा समूह जेवणाला बसला. दरम्यान एक आकस्मिक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्याच हादरला. या धक्कादायक घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारीही पाऊस पडला.त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरातही शेतीचे झटपट काम करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेत मजूर वाढवले आहे. येथील रमेश जगन्नाथ राहते यांचे मौजा सोनेघाट ता.रामटेक येथील शेतातही शेतमजूर वाढवले गेले होते. 

या शेतात एकाच वेळी तब्बल २५ महिला मजूर काम करत होत्या.दुपारी येथे जेवणाची सुट्टी झाली. त्यामुळे सगळ्याच २५ महिला येथे डब्बा घेऊन सोबतच जेवायला बसल्या.येथे पावसासोबत वीज कडाडणे सुरू झाले. 

थोड्याच वेळात जोरदार वीज येथील महिलांच्या अंगावरच कोसळली.दोन महिलांचा मृत्यू झाला असून इतर पाच महिला जखमी झाल्या आहेत. रामटेक तालुक्यातील मौजा सोनेघाट इथं ही घटना घडली आहे.

मंगलाबाई मोटघरे वय,४० वर्षं रा.शितलवाडी परसोडा ता.रामटेक आणि वर्षा देवचंद हिंगे वय,३३ वर्ष रा.भोजापुर, ता.रामटेक अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहे. 

जखमी मध्ये,जयश्री आकाश जवादे वय,३० वर्ष रा.रामेश्वर वॉर्ड, ता.रामटेक,रंजू राजू अष्टेकर वय,३८ वर्ष रा.रामेश्वर वॉर्ड, ता.रामटेक,कलाबाई कवडू वरघणे वय,६० वर्ष प्रेमिला वासुदेव आष्टनकर वय,४९ वर्ष रा.भोजपुर, रामटेक, वनिता गजानन नागरीकर वय,५५ वर्ष रा.रामेश्वर वॉर्ड, रामटेक असे जखमींची नावे आहे. 

या सगळ्यांना तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहे.या घटनेची माहिती कळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !