ने.हि.महाविद्यालयात महात्मा चक्रधर व सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०९/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात महानुभाव पंथाचे संस्थापक महात्मा चक्रधर स्वामी जयंती आणि शिक्षकदिन म्हणून भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
सर्वज्ञ चक्रधरांनी महाराष्ट्रात प्रबोधनाची पहाट नव्याने सुरू करुन मानवता रुजविली तर शिक्षक हा भावी पिढी घडविणारा शिल्पकार होय,म्हणून शिक्षकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करणारा शिक्षकदिन कार्यक्रम साजरा केल्या गेला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एच . गहाणे,उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकरांनी प्रतिमांना माल्यार्पण करुन केली.यानंतर डॉ.रेखा मेश्राम,डॉ तात्याजी गेडाम,डॉ.धनराज खानोरकर,डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ हर्षा कानफाडे,अधीक्षक,संगीता ठाकरे,प्रा दलेश परशुरामकर, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, डॉ दुपारे मॅडम इ.नी पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार समिती अध्यक्ष डॉ. कुलजित शर्मांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धिरज आतला, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.