ब्रेकिंग न्युज...
तास गावाजवळ (भिवापूर) नागपूर रोडवर ट्रक आणि ट्रॅव्हल्स चा भिषण अपघात.
★ ट्रॅव्हल मधील 6 तर ट्रक मधील 3 जागीच ठार अनेक जखमी.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
नागपूर : नागपूर - भिवापूर हायवे रोडवर भिवापूर जवळील तास गावाजवळ ट्रॅव्हल्स आणि उभ्या ट्रक च्या भिषण अपघातात ट्रॅव्हल्स मधील ड्रायव्हर आणि 5 प्रवासी सहीत 6 तर ट्रक मधील ड्रायव्हर पानटेलावाल्यासहीत दोन एकंदरीत 8 जनाचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅव्हल्स अति वेगामुळे अपघात होवून ट्रॅव्हल्स व ट्रक चा चेंदामेंदा झाला.दि.5 ऑगष्ट 2024 ला नागपूर वरून ब्रम्हपुरी जाणारी मॉ.दुर्गा ट्रॅव्हल्स भिवापूर कडे वेगाने जात असतांना भिवापूर तालुक्यातील तास गावा जवळ हायवे रोडवर परमात्मा एक या चहा टपरी जवळ उभी असलेली
MH - 33 AP 2966 क्रंमाकाची ट्रक ला दुपारी 12 चे सुमारास धडक दिल्यामुळे चहा पेत असलेला ट्रकचा चालक पानटेला वाला व अन्य एक ट्रक खाली दबल्या गेलेत तर ट्रकचा टायर निघुन ट्रक ने पलटी खाल्ली तर ट्रक चा पुढील भाग चेंदामेंदा झाला. ट्रॅव्हल्स मधील ड्रायव्हर व अन्य 5 प्रवासी सहीत 6 व्यक्ती जागीच ठार झाले.
ट्रॅव्हल्स क्यॉबिन पुर्ण चेंदामेंदा झाल्यामुळे तिन चार व्यक्ती ट्राव्हल्स च्या अंदर दबल्या गेलेत.भिवापूर पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी दोन स्क्रेन च्या सहाय्याने दबलेल्या लोकांना बाहेर काढले तर किरकोड जखमी प्रवासांना ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे पाठविण्यात आले. बघ्याच्या गर्दीमुळे रहदारी एक तास बंद ठेवावी लागली.मृतकाचे नावे कडू शकले नाही.