लांडग्याचा हल्लात मेंढ्या ठार 30 मेंढ्या जागीच ठार तर 10 जखमी.
📍मेंढपाळ भयभीत, लाखोंच्या आर्थिक नुकसान.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील गडिसुर्ला चुरुड तुकूम येथे गावा शेजारी असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर लांडग्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला चढवल्याने 30 मेंढ्या जागीच ठार तर 10 जखमी झाल्याची घटना सोमवार (दि.11)ला सकाळी उघडकीस आली.असून सदर मेंढ्या नितेश मैसू येग्गावार यांच्या मालकीच्या आहेत.
या घटनेत मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गावात हळ हळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस पाटील मालाताई वाळके यांनी पोलीस प्रशासन व वन विभागाला माहिती दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच संजय येणुरकर,क्षेत्र सहाय्यक ए.एम.बोधे,वनरक्षक प्रियांका लांडगे, ग्रा.प.सदस्य प्रीतम आकुलवार,पोलीस पाटील मालताई वाळके,लहामगे आदी उपस्थित होते.
गावातील चराईच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जगाचा शिल्लक नसल्याने मेंढपाळांना चरईसाठी अडचण होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतात धानपीक उभे असल्याने मेंढपाळांना मोठी अडचण होते परिसरात जंगल नसले तरी हिंस्र प्राण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे या मेंढपाळांनी गावालगत मेंढ्यांचा कळप विसावतात मात्र धोका असल्याने त्यांनी जागली करणे टाळले आहे त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रशासनाने मेंढपाळांना संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे.
मुल पंचायतीचे माजी सभापती तथा तालुका अध्यक्ष भाजपा मुल चंदु मार्गोनवार यांनी घटनास्थळाला भेट दिली असून मेंढपाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून नुकसानग्रस्त मेंढपाळाला तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
मुल तालुक्यातील गडीसुर्ला येथील लांडग्याच्या हल्ल्यात मेंढपाळांच्या 30 बकऱ्या ठार झाल्याने मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने चौकशी करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी. व मेंढपाळना संरक्षण द्यावे. - चंदु मार्गोनवार,तालुकाध्यक्ष भाजपा मुल