राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली तालुका अध्यक्षपदी मोरेश्वर भाऊ भांडेकर यांची निवड.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 18 ऑगस्ट 2025 गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी यांनी घेतलेल्या ठरावानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो )नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांच्या आदेशान्वये नवीन सदस्य व पदाधिकारी निवड करण्याचे संपूर्ण जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.
महिला आघाडी, युवा मोर्चा आघाडी व विविध आघाड्यांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर भाऊ भांडेकर,यांची गडचिरोली तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दीपक भाऊ सातपुते यांची निवड करण्यात आली.
युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रशांत शहा,यांची निवड करण्यात आली आहे चामोर्शी तालुका सचिव पदी संतोष बुरांडे यांची निवड करण्यात आली.याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, राहुल भाऊ झोडे,जेष्ठ नेते देवांनंद भाऊ खुणे,प्रवक्ता ग्यानेंद विश्वास
राष्ट्रीय महिलाआघाडी अध्यक्षा पौर्णिमा विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, बाळू भाऊ मामीडवार,तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, विशाखा सिन्हा यांनी अभिनंदन केल आहे,