मृतक प्रियंका पराग कुंदोजवार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ८ जणांना अटक.
📍आष्टी येथील कुंदोजवार परीवारातील ८ आरोपींना अटक.
एस.के.24 तास
चामोर्शी : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ८ आरोपींना काल १५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.
आरोपीमध्ये
1) पराग दिवाकर कुंदोजवार
2) दिवाकर मुरलीधर कुंदोजवार
3) छाया दिवाकर कुंदोजवार
4) सुमित दिवाकर कुंदोजवार
5) सतिश चंद्रकांत कुंदोजवार
6) पुनम सतिश कुंदोजवार
7) व्यंकटेश मुर्लीधर कुंदोजवार सर्व रा. आष्टी ता.चामोर्शी
8) पल्लवी सुरेश वैरागडवार मानेवडा चौक,नागपुर यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार यातील आरोपींनी संगनमत करून मृतक प्रियंका पराग कुंदोजवार वय,२८ वर्ष रा.आष्टी हिचे पती पराग दिवाकर कुंदोजवार यांनी पल्लवी सुरेश वैरागडवार हीचे सोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे मृतक प्रियंका हिचे सोबत वारंवार झगडा भांडण करुन सतत शिविगाळ करुन,शारीरीक,मानसीक त्रास दिला.
प्रियंकाचे सासरे दिवाकर मुर्लीधर कुंदोजवार,सासु छाया दिवाकर कुंदोजवार,दिर सुमित उर्फ विक्की दिवाकर कुंदोजवार, व्यंकटेश मुर्लीधर कुंदोजवार, सतिश चंद्रकांत कुंदोजवार,पुनम सतिश कुंदोजवार या लोकांनी वारंवार झगडा भांडण करुन संगनमताने शारीरीक व मानसीक त्रास दिला.
छळ करुन तसेच क्रुररतेची वागणुक देवुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार सुवर्णा अनंत कत्रोजवार रा.गडचिरोली यांनी आष्टी पोलीस ठाण्यात केली.
यानुसार आरोपीविरोधात अपराध कमांक व कलम २१८/२०२५ कलम ८५, १०६, ११५ (२), ३५२, ३ (५) बि.एन.एस.-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.