चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील 2 मुलांचा तालुक्यातल्या टेकरी नदीत बूडून मृत्यू झाला.
एस.के.24 तास
सिंदेवाही : पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या टेकरी नदीत घडली.
जित वाकडे वय,17 वर्ष,आयुष गोपाले वय,16 वर्ष अशी मृतक सिंदेवाही येथील आहेत.शालेय सुट्टीचा दिवस असल्याने नदीवर पोहण्यासाठी सिंदेवाही येथील काही मुले टेकरी गावाजवळील नदी घाटावर पोहण्यासाठी गेली होती.याच वेळी दोघांचा नदीच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीसांनी मृतकांचे शव पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविले.
या घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात दुर्दैवी घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे.घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.