सिताराम मरापे यांच्या सेवाकार्यची सरपंच नंदकिशोर वाढई यांनी घेतली दखल : कळमना भुषण पुरस्कार देऊन गौरव.
राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे गाव स्वच्छ, सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पुरक आणि जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गाव असून येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण व सुरक्षा अशा अनेक बाबतीत नैत्रदिपक विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळेच आज एक वेगळी ओळख गावाला प्राप्त झालेली आहे.
आणि निश्चितपणे आपल्या या सेवाव्रताच्या साधनेत सहकार्य करणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीच्या कामाची दखल घेऊन त्यांना मानसन्मान देण्यामध्येही आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी एक अभिनव पायंडा पाडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळमनाचे ग्रामविकास अधिकारी सिताराम मरापे यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन नंदकिशोर वाढई यांनी त्यांची बदली झाल्याने गावकऱ्यांच्या अपार प्रेमने त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना निरोप दिला आहे.
आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या विविध उपक्रमाच्या प्रभारी अंमलबजावणीसाठी श्री. मरापे यांनी कायम खंबीर पाठिंबा दिला. अत्यंत परिश्रमातुन गावकऱ्यांच्या मदतीने कळमना हे गाव आदर्श ग्राम केले. या गावाला जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश,
पश्चिम बंगाल, दिल्ली अशा विविध राज्यांतील पंचायत राज कमिटेचे पदाधिकारी यांनी भेट दिली. प्रा. राजेंद्र कराळे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना यांनी या गावाला भेट दिली. महाराष्ट्रातील अनेक सरपंच महोदयांनी भेट दिली. शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन हे गाव आदर्श करता आले हे सर्व सुरळीत सुरु असताना अचानक ग्रामविकास अधिकारी सिताराम मरापे यांची शासकीय नियमानुसार बदली झाली.
त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी समारंभ आयोजित करून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, वृक्षभेट देऊन विशेष सत्कार केला तसेच कळमना भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांची आठवण म्हणून त्यांच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प सोडला. त्याचबरोबर नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवक सौ. शुभांगी कवलकर यांना सुध्दा वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, सत्कार मुर्ती ग्रामसेवक सिताराम मरापे , मरापे ताई, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रा. प. सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंजना दिवाकर पिंगे, मुख्याध्यापिका बेबीनंदा पुणेकर, ग्रामसेवक शुभांगी कवलकर, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनीता ऋषी उमाटे, नुतन आत्राम माजी सरपंच, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते डॉ. लटारी बल्की, कवडु पाटील पिंगे, विठ्ठल पाटील वाढई
सुरेश पाटील गौरकार, शंकर गेडाम सहाय्यक शिक्षक, शालीक पेंदोर, ग्राम संघाचे अध्यक्ष मीना भोयर, श्रावण गेडाम उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,संगीता उमाटे सी आर पी उमेद, सुचीता धांडे कुषी सखी, लताताई शिरसागर सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका, कल्पना क्षिरसागर आशा वर्कर, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप निमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वनिता गौखरे यांनी केले. कार्यक्रमाला समस्त गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.