वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार. - वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार



वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार. - वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार 


नितेश मँकलवार!उपसंपादक!S.K.24 TAAS


मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी वितरित करण्यासंदर्भात आज वन विभागाने निर्देश जारी केले आहे. वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे वन विभागाचे प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी यांनी आज हे निर्देश जारी केले आहेत.


वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी मनुष्य जीवांचे तसेच शेती बागायतीचे बरेच नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राणाच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढविण्याचा निर्णय वन मंत्री म्हणून ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून बाधितांना  ही भरपाई पंधरा दिवसाच्या आत देण्याचाही नियम केला गेला आहे.


मात्र दिवाळीनिमित्त घराघरात अनेक प्रकारचे खर्च आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन ही भरपाई बाधित व्यक्तींना  दिवाळीच्या आधी मिळावी अशी सूचना वनमंत्र्यांनी केली होती. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया गतिमान करत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची नुकसानभरपाई दिवाळी आधी वितरित करण्याचे आदेश आज वन विभागाच्या सचिवांनी एका परिपत्रकान्वये जारी केले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !