आरमोरी मार्गावरील चुरमुरा गावासमोर वळणाजवळ ट्रॅव्हल्सने दिली एसटी बसला जोरदार धडक ; ट्रॅव्हल्स मधील सुमारे 20 प्रवासी जखमी.
एस.के.24 तास
आरमोरी : आरमोरी गडचिरोली आरमोरी मार्गावरील चुरमुरा गावानंतरच्या पहिल्या वळणाजवळ भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने एसटी बसला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत.अपघाताच्या वेळी बस मध्ये 22 तर ट्रॅव्हल्स मध्ये 30 प्रवासी होते.
अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवासी प्रचंड धास्तावले. मात्र, कुणालाही दुखापत झाली नाही.यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला.या प्रकरणी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,आज सकाळी सुमारे 9:00.वा.च्या सुमारास एसटी बस क्रमांक.MH.14 LX 5926 ही गडचिरोलीहून आरमोरी मार्गे प्रवाशांना घेऊन जात होती.चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर आरमोरीच्या दिशेने पहिल्या वळणाजवळ समोरून येणारे ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करत असल्याने बस चालक बस नियंत्रित करून रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली.
त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक.MH.34 AB 8320 च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत बसला मागून जोरदार धडक दिली.या थडकेत दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॅव्हल्स मधील 20 प्रवासी जखमी झाले.जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी बसचालक शत्रुघ्न मगरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहेत.

