राज्य राखीव दलाच्या गाडीची तंत्रनिकेतन कॉलेज जवळ मोटार सायकल ला धडक ; 1 ठार तर गंभीर जखमी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०७/११/२५ हिंगोली वरून नागपूर, नागभीड ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीला येत असलेल्या राज्य राखीव पोलीस दल बटालियन क्रमांक १२ च्या मालवाहू चार चाकी ट्रक पुढे करण्याच्या अट्टाहासाने समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटार सायकल ला मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोन युवक गंभीर रित्या जखमी झाले. सदर अपघात हा नागभीड ब्रह्मपुरी रोडवर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज जवळ घडला.
जखमींना लगेच ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेत असतांना आशिष राजेश्वर बागडे वय,३२ वर्ष राहणार माहेर याचा वाटेतच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी विजय किशन नागापुरे वय,४० वर्ष राहणार माहेर याचा उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू आहे. अपघात हा काल सायंकाळी ०५ च्या सुमारास घडला.
मालवाहू ट्रक चालक सीआरपीएफ जवान ज्ञानेश्वर ढाले याच्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

