ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगाव - सायगाव मार्गावर ट्रॅक्टर अपघात 2 जागीच ठार 4 जखमी
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील गोगाव - सायगाव मार्गावर गुरुवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. लाकूड कटाईचे काम करून परतत असताना ट्रॅक्टरचे एक्सल अचानक तुटल्याने वाहन ६ - ७ फूट खोल खड्ड्यात कोसळले.या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,गोगाव येथील 7 मजूर ट्रॅक्टरने लाकूड तोडणीसाठी तळोधी येथे गेले होते. काम आटोपून दुपारी 3 वा.च्या सुमारास सर्व जण घरी परतत असताना हा अपघात घडला.गोगाव-सायगाव रस्त्यावर चालत्या ट्रॅक्टरचे एक्सल अचानक तुटले.यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन उलटला.
या अपघातात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीखाली दाबल्या गेल्याने खालील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.प्रवीण प्रकाश भोयर वय,३० वर्ष,शिवाजी बळीराम दोडके वय,५० वर्ष जखमींची माहिती या अपघातात ब्रह्मदास उरकुडा भजगवळी वय,५० वर्ष आणि नीलकंठ रामचंद्र जरादे वय,४२ वर्ष हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अलीफ सुधाकर गजबे वय,३० वर्ष आणि राहुल माणिक धारणे (३५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मेंडकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची नोंद करण्यात आली असून,पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गोगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

