गडचिरोली येथे दुचाकी ट्रक च्या चाकात सापडून झालेल्या भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : कॉम्प्लेक्स भागातून धानोरामार्गे कार्मेल स्कूल शाळेकडे जाताना दुचाकी ट्रकच्या चाकात सापडून झालेल्या भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार झाल्याची घटना 10 डिसेंबर राेजी बुधवार ला सकाळी 8:30.वाजता च्या सुमारास शहरातील चंद्रपूर रोडवर सुचक यांच्या जलाराम दुकानासमोर घडली.
ममता धर्माजी बांबोळे वय,40 वर्ष रा.गडचिरोली असे मृतक शिक्षिकेचे नाव आहे.
MH.34.BZ.1113 क्रमांकाचा ट्रक सिमेंट बॅग भरून बल्लारपूर येथून चंद्रपूर मार्गे आरमाेरीकडे जात हाेता.शिक्षिका ममता बांबोळे हया नेहमीप्रमाणे याच मार्गे शाळेत जात हाेत्या. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लिप हाेत त्या मागच्या चाकाखाली आल्या.या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
पाेलिसांनी त्यांना लागलीच येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले आले.पण 15 मिनिटातच त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या अपघाती मृत्युने शहरात व शैक्षणिक वर्तळात हळहळ व्यक्त केली जात आहे.गडचिराेली पाेलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक प्रसाद मिश्रा याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

