5 मिनिटांत 100 गणिते सिन्नरची देवांशी चालीगांजेवार राष्ट्रस्तरावर अव्वल ; 1500 स्पर्धकांत प्रथम,आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
📍मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निमगाव येथील आशिष चालीगांजेवार यांची मुलगी आहे.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सिन्नर (नाशिक) : अवघ्या पाच मिनिटांत 100 गणिते अचूक सोडवत सिन्नर च्या देवांशी आशिष चालगंजेवार हिने राष्ट्रस्तरीय नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स इंडियन ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे.रविवार (दि.18) रोजी पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील1,500 स्पर्धक सहभागी झाले होते.
मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निमगाव येथील आशिष चालीगांजेवार यांची मुलगी आहे.ते सिन्नर नाशिक येथे वास्तव्यास आहेत. स्पर्धेत ठरवून दिलेल्या पाच मिनिटांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच सर्व 100 प्रश्नबिनचूक सोडवले.या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची आगामी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा 2 महिन्यांनी पणजी (गोवा) येथे होणार आहे.
देवांशी ही सिन्नर येथील होरायझन अकॅडमीमध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहे. यापूर्वी तिने तालुकास्तरीय स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने सिन्नर येथून दिली होती.त्यानंतर नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक मिळाला.
पुढे नाशिकमध्येच पार पडलेल्या राज्यस्तरीय इंडियन ऑलंपियाड स्पर्धा - 2025 मध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रस्तराची वाटचाल निश्चित केली.या यशासाठी देवांशीला " हिस अबेकस टीम " च्या श्रुतिका मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उज्वल यशाबद्दल नातेवाईक,शिक्षकवर्ग व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



