वाघाच्या हल्ल्यात जखमी असलेली महिला सोनम उंदीरवाडे यांचे निधन...
![]() |
गडचिरोली : आंबेटोला येथील सोनम जितेंद्र उंदीरवाडे ही चार दिवसापूर्वी आपल्या शेत शिवारात नरभक्ष बाघाच्या हल्यात गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत असताना सोनम या महिलेला वाचविण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असताना सुद्धा सोनम उंदीरवाडे या महिलेने नागपूर येथील शासकीय रुग्णालयालात मृत्यूशी झुंज देत असतानाचआज दिनांक 09.12.2022 ला सकाळी सहा ते सात च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला तिची प्राणज्योत मालविली.
तिच्या दुःखद निधनाची वार्ता कडताच आंबेशिवणी आंबेटोला या गाव परिसरावर दुखाचे डोंगर कोसडले सोनम उंदीरवाडे या महिलेच्या पाठीशी एक दोन वर्षाची मुलगी असून आईच्या दुःखद निधनाने ती पोरकी झालेली आहे.सोनम उंदीरवाडे या महिलेचे अंत्यसंस्कार आंबेशिवणी आंबेटोला येथेच करण्यात येत असल्याचे तिच्या नातेवाहिकांनी सांगितले आहे.