सोडे आश्रमशाळेतील विद्यार्थाच्या जेवणात विषबाधा.
★ १०५ विद्यार्थी दवाखाण्यात भरती.
मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
धानोरा : धानोरा तालुक्यातील अवघ्या ५ कि.मी अंत रावरील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे सकाळच्या जेवणात विषबाधा निर्माण झाला असुन सदर शाळेतील १०५ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले.
दि.२० डिसेंबर रोजी सकाळच्या जेवणात विद्यार्थीना आलु गोबी वरण भात देण्यात आले असता सुरवातीला विध्यार्थ्यांना उलटी ' हगवण सुरू झाली.सुरवातीला १५ विद्यार्थाची प्रकृती बिघडली त्यांनां धानोरा रुग्णालयात भरती करताच लागोपाठ १०५ विध्यार्थांना भरती करावे लागले.यापैकी १५ विद्यार्थांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.
७५ विद्यार्थाना धानोरा रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली.तर सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती असलेल्या १५ गंभीर विध्यार्थ्यांवर सिव्हील सर्जन डॉ.खंडाते आपल्या चमूसह लक्ष ठेवून उपचार करीत आहेत.तर आदिवासी प्रकल्प अधिकारी राहुल मिणा सामान्य रुग्णालयात ठाम मांडून बसले आहेत.आदिवासी विकास प्रकल्प अर्तगत आश्रम शाळा च्या व्यवस्थापनेवर प्रश्न चिन्ह उभा ठाकला आहे.
जेवणाचा टेंडर ठेकेदारांना दिला असला तरी शाळेतील शिक्षकच स्वयंपाक बनवितात असे बोलल्या जात आहे.मुख्याध्यापक मंडलवार यांचे दुर्लक्ष दिसुन येत असुन स्वयंपाक करीत असतांना चिपकली तर पडल्या नसावा ना अशा तर्कवितर्क सुरु असुन अधिक तपासाअंती कळेल.

